तोंड येणे .... कारण, धोका आणि उपाय
तोंड येणे:-
'बी' जीवनसत्वाच्या अभावामुळे जास्त करू तोंड येत असते. जिभेचा किंवा तोंडातील आतील भाग लाल होतो व खाताना आणि पाणी पिताना त्या ठिकाणी झोम्बते. तिथे जखम तयार होते व ती खूप दुखते. हा आजार आठ ते दहा दिवस चालतो व नंतर आपोआप बरा होतो.
जेवणात पालेभाज्या ठेवल्यास शक्येतो हा आजार होत नाही किंवा हा आजार होण्याचे प्रमाण कमी होते.
सतत चहा कॉफी, तंबाखू, धूम्रपान, दारू या करणामुळेसुद्धा हा आजार होतो.
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तरीही हा आजार होतो.
पोटात जंत, आमांश, इत्यादी जुने आजार असले तरी हा आजार होतो. अशावेळी मूळ आजारावर उपचार केल्यास तोंड येणेही बंद होते.
दातांमध्ये गालाचा किंवा जिभेचा भाग चावल्या गेल्यामुळेसुद्धा हा आजार होतो.
एड्स या आजाराने तोंडात बुरशी किंवा वृण येतात.
कर्करोगाची सुरुवात ?
तोंडात किंवा जिभेवर दीर्घकाळ बरी न होणारी जखम किंवा पांढरा चट्टा असल्यास कर्करोगाची भीती असते. यावेळी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आमच्या आणखी पोस्ट वाचा.
·
'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते? तिचे फोटो बघा
· ह्या गोष्टी पाळा आणि ATM कार्डच्या फसवणुकीपासून स्वतःला
वाचवा
· पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (NFR) मध्ये अप्रेन्टिस पदाच्या ४४९९
जागा
· Jio देतोय ५ महिने डेटा फ्री । काय
आहे ऑफर नक्की वाचा. Jio 5 months free data offer
· 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात
कशी दिसते? तिचे फोटो बघा
एड्स ची शंका :-
वारंवार तोंड येणे व तोंडात बुरशी येणे हे एड्स चे एक लक्षण असू शकते परंतु जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत घाबरण्याचे काही कारण नाही.
उपचार:-
बी जीवनसत्वाच्या गोळी रोज याप्रमाणे घेतल्यास पाच ते सहा दिवस हा आजार बरा होऊ शकतो किंवा डॉक्टरांकडे गेल्यास तात्पुरता हा आजार एका इंजेकशन ने हि बरा होतो.
काही घरगुती उपाय केले तरीही हा आजार बरा होऊ शकतो.
तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. यासाठी जाईची 5-6 पाने स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे. रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. असे दिवसातून 3-4 वेळा,या प्रमाणे 4-5 दिवस करायला सांगावे.
दुसरा एक उपाय म्हणजे सहाणेवर तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठमध उगाळून गंध तयार करावे. तोंडातील अंतर्भागात हे गंध सगळीकडे झोपताना लावावे (चूळ भरू नये). असे 4-5 रात्री करावे.
सोनकाव सायीत मिसळून व्रणावर लावल्यास वेदना कमी होते.
तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होते.
हळद लावण्याने व्रण लवकर भरुन येतो.
तोंड आलेल्या ठिकाणी जात्यादि तेलाने गुळणी करावी.
इरिमेदादी तेल लावल्याने तोंडातला व्रण सौम्य होतो.
वारंवार तोंड येण्याचा त्रास असल्यास त्यामागे (काही जणांच्या बाबतीत) बध्दकोष्ठाचा त्रास असण्याची शक्यता असते, अशांना संध्याकाळच्या जेवणानंतर दोन-तीन तासांनी तेल किंवा तूप (पाच-सहा चमचे) द्यावे. त्यानंतर लगेच एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाव्याचा मगज (दीड ग्रॅम) घेण्याचा सल्ला द्यावा. यामुळे पहाटे पोट साफ होते. असे दर 2-3 दिवसांनी चार-पाच वेळा करावे. याबरोबरच तोंड येणा-या व्यक्तींनी तिखट, अतिखारट व आंबलेले अन्नपदार्थ टाळावेत.