छानसा गारवा

छानसा गारवा


कशी काय तेथे हवा आज आहे
इथे छानसा गारवा आज आहे

दुपारी किती लाघवी उन्ह आले 
नभी सूर्य की चांदवा आज आहे

जरा सांग बाई मला एकदा तू
तुला मी नको की हवा आज आहे


         कवी- मधुसूदन नानीवडेकर
और नया पुराने