तोच घाव

जीवनाच्या प्रवासात 
मी स्वतःला का जपत असेल 
तिच्यासमोर वावरूनही 
तिला का दिसत नसेल 

तिच्या आजच्या आठवणीने 
माझ्या डोळ्यात अश्रू आले 
तिने दिलेल्या जखमेचे तर 
केंव्हाच नाश्रूं झाले 

स्वतःला किती समजूनही 
मन तिचीच ओढ खात 
तिचा आता पत्ता नसतानाही 
का तिचेच गुण गात 

तिला प्रथम पाहताच 
काही तरी काळजात घुसलं 
तोच घाव अजून आहे 
नाव तर तीच केंव्हाच पुसलं 
और नया पुराने