कशाला हवं ?

कशाला हवी साक्ष 
माझ्याच सजेसाठी 
कशाला तो अर्ज 
मारण्याच्या रजेसाठी 

उगच आपलं 
भरकटत राहावं 
कशाला हवा वेळ 
नुसता मज्जेसाठी 

आपलं वागणं 
हवं नीटनेटकं 
कशाला ती वस्त्र 
नुसत्या लज्जेसाठी 

एक एक शब्द हा 
सांभाळून वापरावा 
कशाला हवी कळ 
नुसत्या खाज्जेसाठी 

शत्रूंशी लढायला 
अंगी हवं बळ 
कशाला एव्हढी मस्ती 
नुसत्या माज्जेसाठी 

स्वतःचे रक्षण 
स्वतः करावे 
कशाला अंगरक्षक 
शिवाजी राजेसाठी 
और नया पुराने