वाटत या गालीच्यावर हिरव्या
वाटत तू आणि मीच असावं
काही प्रेमाच्या तर काही जिव्हाळ्याच्या
गप्पा मारत निवांत बसावं
पण आताही तुझा आभाव आहे
कारण लवकर न भेटणं तुझा स्वभाव आहे
मी आणखीही तुझी वाट पाहतो
तुझ्या प्रतिक्षेत रस्त्यावरच राहतो
तु भेटशील याची मला जाणीव आहे
म्हणूनच तुला विसरण्याची माझ्यात उणीव आहे
तुला मी कधीही आठवत असतो
त्या आठवणी कोठेही साठवत बसतो
तू तर नाही तुझा भास संगे आहे
माझा मित्र म्हणून तोच खास आहे
जीवन जगायला खूप कमी आहे
तुझ्यासंगे मात्र जीवनाची हमी आहे