नयन शराबी

नयन शराबी तुझे लाडले 
मदधुंद मला करतील ग 
आवर जरा तू स्वतःला 
तुझ्या प्रेमात चराचर पडतील ग 

ओठ दिसतसे जणू पाकळ्या 
गालावरच्या हसऱ्या नाजूक खळ्या 
भाळी तुझ्या त्या खट्याळ बटा 
तुला बघुनी जीर्ण वृक्षपण 
जगण्यास पुन्हा धजतील ग 

हास आणि हास जराशी 
तुझी प्रतिमा आहे उराशी 
माझा तुला डाव नाही कळणार 
घेऊन तुझी संगत सजणी 
माझे ग्रहमानही फिरतील ग 

तुझी पाहुणी कवळी काया 
मन करते ग तिकडे जाया 
सांगण्या तुला शब्द आडला 
तोच मला प्रश्न पडला 
और नया पुराने