निसर्ग सौंदर्यात मला तिचाच भास होतो
ती अस्तित्वात नसतानाही का तिचाच वास येतो
कोण असेल ती जिने भुलविले मला
का तिची कल्पना झाली असेल मला
असे असेल तर मला ते केंव्हा कळेल
अखेर ती मला केंव्हा मिळेल ?
तिच्यासाठीच एवढा जीव बावरला
तरीपण तिच्यासाठी थोडा सावरला
तिलातर मी कधीच पाहिले नाही
ते दर्शनच मला पावले नाही
तिची कल्पना किती छान आहे
तिचे अस्तित्वच माझी शान आहे
कारण तिच्या शिवाय कविता नाही
आणि कवितांशिवाय मी की "कवी" नाही