त्या पावसात.

कालच्या त्या पावसात
मी पहिला पाऊस आठवला
अन् पापणीवर येण्याआधीच तो थेंब
तसाच डोळ्यात साठवला

उभी राहिले दारात उगीच 
ओलं व्हावं सहज म्हणून 
कदाचित त्यालाही कळलं आता
मला तुझी आठवण येते म्हणून 

गरजू लागला तो ढग असा
कि धो धो लागला पडायला 
मी लपवलेला एक एक अश्रू
तो बाहेर लागला काढायला

पणावायचे डोळे रोज
पण लाज वाटे रडायची
उभी रहात होते दारी
वाट पाहायचो पाऊस पडायची 

मग त्या पडणा-या पाऊसात
मी खळखळून रडायचे
गालावरच्या पावसांच्या थेंबात
अश्रू सहज बुडायचे

मी पुन्हा दुस-या पावसापर्यंत
बंधन हेच पाळायचे
पाणावलेल्या डोळ्यांतले थेंब
मी डोळ्यांमध्येच गिळायचे


और नया पुराने