तू अशी जवळी रहा

                                            तू अशी जवळी रहा

           स्वतः जवळ दोन दिवस जगता येतील एवढेही पैसे नसतांना मी सविताला तिच्या घरातून, तिचं लग्न ठरल्यावर राञीलाच एवढया दुर पळवून आणलं. ती कधीही आपल्या आईपासून वेगळी राहिली नव्हती, खरं म्हणजे तिच्या आईने तिचे वडिल गेल्यापासून तिला वेगळं ठेवलं नव्हतं. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं होतं. तिच्या आईला तिचे वडिल गेल्यानंतर एकमेव आधार म्हणून सविता होती. ना तिला भाऊ ना बहिन, सविताला मोठं करण्यासाठीच तिची आई जगत होती असं वाटत होतं.

    मी माञ टवाळखोर, बेरोजगार, बेजबाबदार आई वडिलांच्या जिवावर मजा मारणारा गल्लीतला टवाळखोर पोर. दिवसाचे ६ ते ८ तास सविताच्या घराजवळ किंवा घरासमोरुन बाईकवर यरझरा मारायचो, सविता कधीही, कोणाकडेही न बघणारी पोर दिसायला देखणी. पटवण्यासाठी सतत तिच्या गल्लीत फिरायचो. आई वडिलांनी आणलेलं फक्त खात राहियचो, २४, २५ वर्षाचा घोडा झालो होतो तरी काम न करता उनाडक्या करायचो. 

खरंतर सविता कधी माझ्या प्रेमात पडेल किंवा ती मला भाव देईल असं कधीच मला वाटलं नाही पण मीपण एवढा नालायक होतो कि एवढं कळूनसुद्धा सतत ६ वर्ष तिला आकर्षित करण्यासाठी, तिच्याशी ओळख करण्यासाठी तिच्या घराच्या आवती भोवती फिरायचो एवढंच नाही तर तिला बघायला आलेल्या मुलाच्या कानफटातही ठेऊन दिली होती. माझं सुदैव कि त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली नाही.


ज्यावेळी मी तिला प्रपोज केलं किंवा माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहचवल्या होत्या त्यावेळी तिने जो होकार दिला होता तो माझ्यासाठी सर्वात मोठा विजय होता कारण माझी आणि तिची कोणत्याही पद्धतीत जोडी जमत नव्हती. 

मी टुक्कार, टपोरी, एकदम गयागुजरा, ती सुशील, कधीही घर न सोडणारी. मी सावळा, ती एकदम लख लखीत गोरी. मी झोपडपट्टीत वाढलेलो, ती चांगल्या काॅलनीत वाढलेली जबाबदार मुलगी. मी आठवी नापास, ती ग्रॅज्युएट पुर्ण केलेली हुशार मुलगी. मी आई वडिलांच्या जिवावर टवाळक्या करणारा मुलगा, ती आईला त्यांच्या ईस्ञीच्या बिझिनेसमध्ये मदत करणारी मुलगी..... हे सगळे विरोधाभास असतांनाही मी केवळ तिच्या रुपाच्या आकर्षणापाई तिच्या प्रेमात पडलो आणि ती माझ्या वेडेपणात प्रेमात पडली.

खरं म्हणजे ती जेंव्हा हो म्हटली होती तेंव्हा माझा मलाच विश्वास बसत नव्हता, मीच पागल झाल्यासारखा वाटत होतो. कारण हे असं काही होईल ह्याची मलाच कल्पना नव्हती. पण जे झालं होतं ते माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती त्यामुळे मला आता मागे पहायचं नव्हतं. अगोदर मी फक्त टाईमपास म्हणून सुरू केलं होतं पण आता ते खरं झालं होतं. एखाद्या स्वप्नाप्रमाणेच घडत होतं.

तसंतर बरेच दिवस आमचं छान चाललं होतं, आणि कोणालाच काही माहीत नव्हतं. पण तिला बघायला मुलगा आला आणि ईथेच सारं बिघडलं. तिला असं कोणीतरी बघून जाणं मला आवडलेलं नव्हतं त्यामुळे त्या रागाच्या भरात मी त्या मुलाला मारहाण केली होती. खरं म्हणजे त्या बिचाऱ्याचं काहीच चुकलं नव्हतं परंतु भावनेच्या भरात माझीच चूक झाली होती. पण माझीही चूक झाली असं कसं म्हणता येईल?, माझ्या सविताला कोणीतरी पसंद करावं हे मी कसं सहन करायचं होतं? माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि हे सारं घडलं होतं.

ह्या अशा झालेल्या प्रकारामुळे सविताची आई सावध झाली होती. कोणत्याही परिस्थितीत सविताचं ह्याच वर्षी लग्न लावून द्यायचं असा निर्धार केला होता आणि ह्या तिच्या निर्धारामुळे सविता पूर्ती घाबरली होती त्यामुळे तिने माझ्याकडे काहीतरी करण्याचा तगादा लावला होता.

मी तिच्या घरी तिला मागायला जावं तर आमची जातही वेगळी होती शिवाय मी एवढा गेलेलो होतो कि तिच्या जातीतला असतो तरिही मला तिच्या आईने सविताला दिलं नसतं त्यामुळे आमच्यासमोर एकच पर्याय होता आणि तो म्हणजे पळून जाणे.

त्यामुळे माझाही नाईलाज झाला, शेवटी आम्ही पळून जाण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे, ठरल्यावेळी मी तिला पळवून लांब भोपाळला नेलं. मी कधीही, कुठेही काम न केल्यामुळे भविष्य खडतर वाटायला लागलं. अगोदरचे काही दिवस घरातून आणलेल्या पैशांवर काढले पण असंच बाहेर रहायचं म्हटलं तर काहीतरी करावं लागेल असं वाटू लागलं. मग अगोदर बेकरी, नंतर किराणा दुकान, मग कपड्याचं शोरुम असं एकना अनेक कामं केली पण कधीच परत नाही गेलो.

या एवढ्या प्रवासात सगळ्यात वाईट वाटतं ते हे कि मी सविताला तिच्या आईपासून दुर केलं. तिच्या आईला कोणाचाही सहारा नसतांना केवळ सविताच्या सहा-याने जगणाऱ्या तिच्या आईचा सहारा मी काढून घेतला होता आणि आयुष्यभर टोचणारा हाच माझा मोठा अपराध झाला होता.

आज आम्ही पळून आलेलो जवळपास बेचाळीस वर्ष झाले. मी सविताला काहीच कमी पडूदिलं नाही आणि तिनेही कशाचीच तक्रार केली नाही. आजही तिच्याकडे बघतो तर ती त्यावेळेसचीच स्माईल मला ती देते यापेक्षा मोठं भाग्य काय म्हणावं. पण दुर्दैव म्हणावं कि सुदैव हेच कळत नाही कि आमच्या नशिबी अजून मूल नाही. 

आम्हाला मूल नाही याचं आम्हा दोघांनाही दुःख नाही कारण आम्ही माणतो कि आम्ही दोघे सगळा महाराष्ट्र सोडून या भोपाळमध्ये आलो, ईथे ना ओळखीचे कोणी ना आपलं कोणी. आम्ही दोघे होतो म्हणून आम्हाला कोणाचीही कधी भिती वाटली नाही ना कोणाची गरज पडली; नव्हे आम्हाला कधी एकमेकांपासून लोकांची काळजी करण्याची फुरसतच नाही भेटली. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत अखं आयुष्य जगलो, आज असं वाटतं कि आजही मरण आलं तरी आम्ही खुशाल मरायला तयार आहोत कारण भविष्य किंवा भूत आमच्याकडे काहीच नाही चिंता करण्यासारखं, एक क्षणही चिंता वाटत नाही मरणाची किंवा मेल्यानंतर प्रेताला मुखाग्नी कोण देईल याची. नाही वाटत वाईट पळून येऊन जगल्याचं किंवा नातेवाईकांच्या लग्न समारंभात तयार होऊन सुख उपभोगल्याचं. हा... समाधान माञ आभाळभर आहे एकमेकांना साथ दिल्याचं. भलेही देवाच्या साक्षीने लग्न केलं नसेल आम्ही पण देवाच्या साक्षीने सांगू शकतो कि काळजाच्या आतल्या ठोक्यापासून जपलं एकमेकांना.

हे आपल्या आयुष्याचे सगळे विचार मनात आणत असतांनाच रोहन काकांच्या जाड काचाच्या चष्म्याच्या आतून ठळक आश्रू दिसत होते, जे रोशनकाका लपण्याच्या आटोकाट प्रयत्न करत होते. तेवढ्यात आतून सविता काकूचा आवाज आला.

सविता- "अरे! तुझी BP ची गोळी घेतलीस का?, तिथे थंडिला का बसलास?
.


.

.
.
रोहनकाकांना आपला हुंदका आवरता न आल्यामुळे काहीच बोलले नाही, त्यामुळे सविताकाकीच त्यांच्याकडे येत बोलल्या...

सविता-."अरे मी काय.......

वाक्य पुर्ण करणार तेवढ्यात त्यांना रोहनकाकांच्या चष्म्यातून वाहणारे आश्रू दिसले.

सविता- "रोहन काय झालं? परत वाईट वाटून घेतोयसका आपल्याला वारस झाला नाही म्हणून? रोहन तुला कितीवेळा सांगितल कि ह्या गोष्टींसाठी डोळ्यांत आश्रू आणतजाऊ नकोस. देवाने आपल्या दोघांना मनसोक्त आयुष्यभर एकमेकांचं प्रेम मिळावं म्हणून आपल्या दोघांत तिसरा पाठवला नाही."

रोहन- "तसं नाही गं काही"

सविता- "मग?"

रोहन- "सवे!, आज तुला सांगूनच टाकतो"

सविता- "आज म्हणजे? , तू काय लपवलयस माझ्यापासून? "

रोहन-."अगं मी कधीच मुलासाठी रडलो नाही"

सविता- "म्हणजे? , तू एवढ्या वेळेस रडल्यावर मला कारणे सांगितले ते काय होतं"

रोहन- "ते ह्यामुळे रडतो कि मला आजही वाईट वाटतय कि मी तुला तुझ्या आईपासून दुर केलं. तुला तर मी सांभाळलं पण तुझ्या एकट्या आईचं काय झालं असेल याचं मला आयुष्यभर वाईट वाटलं आणि वाटेल"

रोहनचे असे भावनिक शब्द ऐकून सविता त्याच्या गळ्यात पडली, असला काहीच विचार करू नको म्हणत तिही अश्रू ढाळायला लागली. वयाची साठी ओलांडली होती तरि एकमेकांवर आजही जिवापाड प्रेम करत होते दोघेही.

रोहन- "सवे! एक मागू?"

सविता- "हम्म"

रोहन-"तू अशीच जवळी रहा'

आणि सविताकाकूने रोहनकाकांना अजून घट्ट मिठी मारली. 




(वाचक मिञ आणि मैञीणिंनो ही माझी अतिशय शाॅर्ट स्टोरी आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आपल्या आवडल्यास अशा अजून अतिशाॅर्ट कथा घेऊन येऊ.😊)
और नया पुराने