Work from home काम शोधताय? त्या अगोदर हे वाचा.

 Work from home काम शोधताय? त्या अगोदर हे वाचा. 


कोरोनाचा विळखा जसा वाढला तसे बरेच लोक घरात बसून काम करू इच्छित आहेत त्याच बरोबर बऱ्याच कंपन्या Work form home काम करून घेण्यास तयार आहेत परंतु ह्यातही बरेच froud होत आहेत. ते कसे होतात आणि आपण कसे सावध राहिले पाहिजे ह्याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. 


मार्केटमध्ये बऱ्याच फ्री लेन्सर कंपनीज आहेत त्याच बरोबर बरेच लोक विविध ठिकाणी  Work form home च्या जाहिराती करताना दिसून येतात. 


माझा एक Youtuber मित्र आहे ज्याला त्याच्या एका subscriber ने त्याच्यासोबत झालेल्या froud ची माहिती दिली आणि माझ्या मित्राने हे खरं आहे कि खोटं ह्याची परिचिती घेण्यासाठी त्यानेही ह्याचा अनुभव घेण्यासाठी युक्ती केली. 


नेमकं काय घडलं ?

माझ्या त्या मित्रानेही हे खरंच असं होत आहे का हे अनुभवण्यासाठी त्या subscriber ने सांगितलेल्या free lencer कंपनीमध्ये registration केले. आणि एका जाहिरातीला apply केलं , ज्यामध्ये mircrosoft word मध्ये २०० पान type करून द्यायचे होते. ह्या  त्याला ६० रुपये प्रति पान व हे काम ८ दिवसामध्ये करून द्यायचे होते. 

ह्या कामासाठी समोरील कंपनीने ८०% Accuracy सांगितली होती. आणि जर सांगितल्याप्रमाणे Accuracy नाही राहिली तर दिलेल्या कामाचा जो मोबदला आहे तो दिला जाणार नाही असे सांगण्यात आले होते. 

काम घेऊन ३-४ दिवस झाले होते परंतु त्या मित्राने काहीही काम केले नाही, त्याला ते करायचेच नव्हते. परंतु ३-४ दिवसांनी एका  फोन आला ज्यामध्ये ती समोरील व्यक्ती बोलत होती कि आपण जे ३-४ दिवसापूर्वी काम घेतलं आहे ते किती रुपयांप्रमाणे घेतले आहे त्यापेक्षा आम्ही निम्या किमतीत करून देऊ. 

आम्हाला माहित आहे कि ते काम आपल्याला ६० रुपये प्रति पान देण्यात आले आहे परंतु आम्ही तेच काम ३० रुपये प्रति पण करून देऊ शकतो. आमची कंपनी ह्याच संबंधी काम करते व ह्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ हि आहे त्यामुळे आम्ही हे काम तुम्हाला १ ते २ दिवसात करून देऊ शकतो तेही तुम्ही सांगाल त्या accuracy प्रमाणे. 

तुम्हाला हे काम एकूण १२००० रुपयाला मिळालं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर आम्ही हेच काम ६००० रुपयाला करून देऊ शकतो. आणि तेही १ ते २ दिवसात. 


खरं तर हि परवडणारी deal होती परंतु खरी गम्मत पुढेच आहे. 

त्या व्यक्तीने ह्या कामासाठी माझ्या मित्राकडे २००० रुपये advance मागितले आणि त्याच कारण त्या व्यक्तीने असे सांगितले कि आमच्याकडे जे लोक काम करतात त्या लोकांना आम्हाला advance पैसे द्यावे लागतात त्यामुळे आपण आम्हाला advance २००० रुपये दिले तर तुमचे काम लगेच करायला सुरुवात करू. 

राहिलेले पैसे तुम्ही आम्हाला आपले काम पूर्ण झाल्यावर द्यावेत असेही सांगितले. 

मनात एक विचार आला. 

जर हे लोक एव्हढे फास्ट काम करत असतील तर ते तिकडूनच का काम घेत नसावेत? परंतु हे असं काहीही नसून हा एक मोठा froud असल्यामुळे ते जे लोक work from home काम करण्यासाठी free lancer site वर काम शोधतात आणि काम मिळवतात अशा लोकांना हे लोक target करतात. 

धमकी 

माझ्या त्या मित्राने त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला सांगितले कि काम तर करून घ्यायचे आहे परंतु मी जे तुम्हाला पैसे देऊ ते कोणत्या भरवशावर देऊ? जर मी तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही जर ते काम पूर्ण करून नाही दिले तर ते पैसे मला परत कसे मिळणार?

पुढील व्यक्तीने काम पूर्ण न झाल्यास आम्ही आपले पैसे परत करू असे सांगितले. परंतु तरीही माझ्या मित्राने काम आम्हाला करून नाही घ्यायचे. आमचे आम्ही पूर्ण करू असे सांगून फोन ठेवला. 

परंतु लगेच दोन तासानंतर त्याला एक कॉल आला जो पुढील व्यक्ती सांगत होता कि आपण जे ३-४ दिवसापूर्वी काम घेतलं आहे मी त्या कंपनीतून मॅनेजर बोलत आहे. आपल्याला जे काम दिल आहे  ते किती झालं व आपण कधी ते आम्हाला सुपूर्द करणार आहेत. 

जर आपण आपल्याला दिलेलं काम दिलेल्या वेळेत पूर्ण नाही केलं तर आम्ही आपल्यावर कारवाई करू, आपल्यावर पोलीस केस करू. आपण हे काम घेताना आमच्याशी करार केलेला आहे त्यामुळे आपण घेतलेलं काम वेळेत पूर्ण करून द्या असे सांगण्यात आले. 

उद्देश  

 खरंतर त्यांचा हा धमकी देण्याचा उद्देश असा होता कि ज्या व्यक्तीने आम्ही काम करून देतो त्यासाठी २००० रुपये advance द्या असे सांगितले होते त्यांच्याकडून काम करून घ्यावे असा होता. आणि हे सर्वजण एकच होते. 

खबरदारी 

तुम्हाला हा  सांगण्याचा उद्देश असा कि जर तुम्हीही असे online काम , work from home काम शोधात असाल आणि असाच प्रसंग घडला तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आणि शेक्यतो ज्या लोकांची खात्री नाही अशा लोकांची कामे करू नये. 
और नया पुराने